देशाचे राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीमधून जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मोती नगर परिसरात एका दुचाकी स्वाराकडून ४९९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करत एक मोठा कट उधळून लावला आहे. दरम्यान, दुचाकीस्वार फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी मोती नगर रेड लाईट येथे नियमित तपासणीदरम्यान एका दुचाकीस्वाराला थांबवले. पोलिसांनी गाडी थांबवताच दुचाकीस्वार दुचाकी सोडून घटनास्थळावरून पळून गेला. दुचाकीच्या पुढील भागात एक बॅग लपवल्याचे अल्स्खात येताच वाहतूक पोलिसांना संशय आला आणि त्यांनी मोतीनगर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. मोतीनगर पोलिसांनी दुचाकीवर ठेवलेली पिशवी उघडली असता त्यात सुमारे १० काडतुसे भरलेली बॅग आढळून आली, ज्याची संख्या ४९९ होती. चौकशी केली असता दुचाकीही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Delhi | On 7th September, during the checking by traffic police in West Delhi, a bike was stopped by the traffic police. On being stopped, the rider ran away, leaving the bike and other stuff behind. On checking, the bike was found stolen and some live cartridges were found in a…
— ANI (@ANI) September 9, 2024
ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ही काडतुसे मोठ्या टोळीला पुरवण्यासाठी होती का याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक
हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?
‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक
ममता सरकारवर नाराज खासदाराने दिला राजीनामा
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सीमापुरी भागात एका क्लबबाहेर काहींनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. मात्र, या घटनेत जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. हेल्लेखोरांनी क्लबवर डझनहून अधिक गोळ्या झाडल्या होत्या. खंडणीच्या प्रकरणात हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.