भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि बी साई सुदर्शन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ४५० कोटींच्या चिट-फंड घोटाळ्याच्या संदर्भात गुजरात सीआयडीने समन्स बजावले आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. माहितीनुसार, शुभमन गिल याने यात १.९५ कोटींची गुंतवणूक केली होती, तर इतर खेळाडूंनीही काही रकमेची गुंतवणूक या योजनेत केली होती.
गुजरात सीआयडीने ४५० कोटी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि बी साई सुदर्शन यांना समन्स बजावले आहे. या खेळाडूंनी गुंतवलेले पैसे परत मिळाले नसल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी योजनेचा मास्टरमाइंड भूपेंद्र सिंग जाला याची चौकशी केली. आता पुढे या क्रिकेटपटूंची चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे.
बीझेड ग्रुपने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. यात शुभमन गिल याने १.९५ कोटींची गुंतवणूक केली होती तर, इतर खेळाडूंनीही थोडीफार गुंतवणूक केली होती. मात्र, आश्वासना प्रमाणे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार केली. यासंदर्भात आता सीआयडी या खेळाडूंची चौकशी करणार आहे. अहवालानुसार, गिलने १.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे तर इतर खेळाडूंनी अल्प प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
हे ही वाचा :
महाकुंभची जय्यत तयारी मात्र ‘समाजवादी’ला वावडे
बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!
महाकुंभची जय्यत तयारी मात्र ‘समाजवादी’ला वावडे
“दुर्गम, माओवादग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक”
शुभमन गिल सध्या ऑस्ट्रेलियात आहे त्यामुळे तो भारतात परतल्यानंतर त्याची चौकशी करू, असे सीआयडीने स्पष्ट केले आहे. तसेच इतर क्रिकेटपटूंच्या उपलब्धतेनुसार त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पॉन्झी स्कीमचा सर्वेसर्वा भूपेंद्र सिंह जाला याची चौकशी केल्यानंतर या घोटाळ्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, क्रिकेटपटूंनी बीझेड स्कीममध्ये गुंतवलेले पैसे परत केले नसल्याची कबुली जालाने दिली आहे. तर, जालाची खाती सांभाळणाऱ्या अकाउंटंट रुषिक मेहताला सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.