28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामामनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी

Google News Follow

Related

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या अलिशान घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यासाठी तसेच स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन याची हत्या घडवून आणण्यासाठी वाझे अँड कंपनीला कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. त्यापैकी ४५ लाख रुपये एकट्या मनसुखच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना दिल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी न्यायालयात तशी माहिती दिली असून या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची वेळ न्यायालयाकडे मागितली आहे.

अँटालिया स्फोटके तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारी केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए ने या दोन्ही प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे, माजी चकमक फेम प्रदीप शर्मा, बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील माने, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे या आजी माजी पोलीस अधिकारी यांच्यासह या कटात सामील असणारे आणि मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी घेणारे क्रिकेटबुकीं नरेश गोर, संतोष शेलार, सतीश मोटेकरी,मनीष सोनी,आनंद जाधव यांना अटक करण्यात आली होती. सध्या वाझे अँड कंपनीचा मुक्काम तळोजा तुरुंगात आहे.

हे ही वाचा:

पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत

खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार

राज्यात कोरोनामुळे १५ हजार ७७९ मुलांनी गमावले पालक

शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले

या सर्व प्रकणात कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झालेला असून एनआयएला ४५ लाख रुपयाचा हिशोब हाती लागला आहे. इतर आर्थिक व्यवहाराबाबत माहिती मिळवायची असल्याचे एनआयएचे म्हटले होते. दरम्यान मंगळवारी एनआयए न्यायालयात खर्चाचा हिशोब मांडला असून एकट्या मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती असे एनआयएने न्यायालयात संगीतले आहे. ही रक्कम कुठल्या मार्गाने मिळवण्यात आली, याचा शोध घ्यायचा असल्याचे सांगून एनआयएने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ न्यायालयाकडे मागितली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा