मुंबई शहर पोलिसांनी एका अंगडियाच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयातून चोरीला गेलेल्या १ कोटी रुपयांपैकी ४० लाख रुपये जप्त केले आहेत. चोरट्यांनी राजस्थानमधील एका नातेवाईकाच्या घराबाहेर माती खोदून त्यात चोरीचे पैसे पुरले होते आणि कोणलाही संशय येऊ नये म्हणून सीमेंट लावून प्लास्टर करून ठेवले होते. व्ही. पी. रोड पोलिसांनी चोरांना राजस्थान येथून पकडण्यात आले असून, त्यांच्या कडून लपवलेले ४० लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत व उर्वरित चोरांचा पोलिस शोध घेत आहेत.
दक्षिण मुंबई येथील भुलेश्वर परिसरातील दूसरा भोईवाडा परिसरात रणछोडदास इमारतीमध्ये वासव्यास असलेले किरण कांतीलाल पटेल (४६) हे पटेल राजेशकुमार मगनलाल अँड कंपनीमध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या घरात २४ सप्टेंबर रोजी दोन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले होते. चोरांनी १० मिनिटात १ कोटी ४० लाख रुपये चोरी करून पळून गेले. त्यामध्ये ५०० च्या १९ हजार ३०० नोटा आणि ५० हजाराच्या सात हजार नोटांचा समावेश होता. या चोरांची सीसीटीव्हीच्या मदतीने ओळख पटली असून, दोघेही पटेल यांच्या घरी जात असल्याचे दिसून येते.
संबंधित घटनेमध्ये ओळखीच्या व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अरविंदसिंह गोयल (२१) आणि जब्बारसिंह रावतसिंह राजपूत (१९) या दोघांना अटक केली आहे. भुलेश्वर येथील भोईवाडा परिसरातील तक्रारदार किरण पटेल यांच्या दुकानात राजपूत कामाला होता. पटेल यांनी कपाटाच्या बनावट चाव्या बनवल्या होत्या त्याचाच फायदा घेत चोरांनी ही रक्कम चोरली होती.
हे ही वाचा:
रावणाच्या आईने आयुष्य व्यतित केले श्रीराम नामात
कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा
एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
मुंबई पोलिसांचे एक पथक राजस्थानमधील गोयल याच्या घराची झडती घेण्यासाठी गेले असता घरासमोरील भागातील माती खोदून त्यामध्ये लपवलेले ४० लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले. उरलेली ६० लाख रुपयांची रक्कम अन्य दोन संशयित चोरांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.