लोकसभा निवडणुकीपूर्वी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीपूर्वी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगानेही चांगलीच कंबर कसली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यापूर्वीच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, त्यांच्या देखरेखीखालील अधिकाऱ्यांनी विक्रमी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. २०१९ च्या संसदीय निवडणुकीत झालेल्या एकूण जप्तीपेक्षा जास्त ही जप्ती अधिक आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या देखरेखीखालील अधिकाऱ्यांनी विक्रमी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी १ मार्चपासून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दररोज १०० कोटींहून अधिक रुपयांची रक्कम जप्त केली आहे. सार्वत्रिक निवडणुका २०२४ मध्ये जप्त झालेली ही रक्कम गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात नोंदवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे.

हे ही वाचा:

‘आप’ला आणखी एक धक्का, आ. अमानतुल्ला खान यांचा जामीन अर्ज फेटाळला!

मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

निवडणूक आयोगाने सांगितले की, फ्लायिंग स्क्वाड, स्टॅटिस्टिकस सर्व्हेलंस टीम, व्हिडीओ पाहणारी पथके आणि बॉर्डर चेकपोस्ट हे जप्तीचे काम २४ तास करत आहेत. रोख, दारू, मोफत वस्तू, अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थांचा वापर आणि वितरण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version