केरळमधील कोची येथील कोचीन विद्यापीठामध्ये गायिका निकिता गांधी यांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री होता. या कॉन्सर्टच्या आधी चेंगराचेंगरी झाली.या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि ६० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले.
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, ६० हून अधिक लोकांवर कलामासेरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि इतर काही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आणखी चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी झाली. पाऊस पडताच लोकांची धावपळ सुरू झाली आणि हा अपघात झाला. निकिता गांधींच्या कॉन्सर्टदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण नंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, निकिता गांधीच्या कॉन्सर्टपूर्वी ही घटना घडली होती.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!
अमेरिकेतील एफबीआयची स्पेशल एजंट आहे भारतीय वंशाची महिला!
तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!
व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) एमआर अजित कुमार यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. प्रेक्षक पायऱ्यांचा वापर करून सभागृहात पोहोचले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोची विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि इतर मंत्र्यांसह तातडीची बैठक बोलावली.
निकिता गांधीन देखील शोक व्यक्त केला आहे.निकिता गांधीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत म्हंटले की, “आज संध्याकाळी कोचीमध्ये घडलेल्या घटनेमुळे दु:खी झाले. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच अशी दुर्दैवी घटना घडली. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्दच पुरेसे नाहीत.”