25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामावाराणसीत एकाच कुटुंबातील ४ जणांची सामूहिक आत्महत्या!

वाराणसीत एकाच कुटुंबातील ४ जणांची सामूहिक आत्महत्या!

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार उघडकीस आला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आत्महत्येचे कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीतील कैलास भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. जिथे एक महिला आणि तीन पुरुषांनी एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेले चारही लोक आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण घटनास्थळाची चौकशी करण्यात येत आहे. कैलास भवन लगतच्या परिसराची पोलीस चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित

मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा

तसेच पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले आहे.फाशी घेतलेल्या सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात येत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.या घटनेबाबत पोलिसांनी अद्याप फारशी माहिती दिलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा