छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमकीत चार नक्षलवादी जखमी

गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही चकमक उडाली.

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमकीत चार नक्षलवादी जखमी

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये लष्कर आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कोब्रा २०२ बटालियनचे दोन जवान जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, चार नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.
गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही चकमक उडाली. लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. चकमकीमध्ये जखमी झालेल्या जवानांची नावे नकुल आणि मोहम्मद शहीद अशी आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षकांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी जखमी जवानांची विचारपूस केली. तर, मीडिया वृत्तानुसार, चार नक्षलवादी जखमी झाल्याची चर्चा आहे.

दंतेवाडा येथे २६ एप्रिल रोजी मोठा नक्षलवादी हल्ला झाला होता. त्यात ११ जवान हुतात्मा झाले होते. दंतेवाडातील अरनपूरमध्ये जिल्हा राखीव रक्षक दलाला घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी स्फोटकांचा हल्ला झाला होता. छत्तीसगडमधील आठ जिल्हे हे नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातात. यामध्ये बिजापूर, सुकमा, बस्तर, दंतेवाडा, कांकेर, नारायणपूर, राजनंदगांव, कोंडागाव यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यात गाडी अडकली; इन्फोसिसच्या इंजीनियरचा मृत्यू

पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तरुणीचा वाचला जीव

ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!

‘पापुआ न्यू गिनी’च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!

९ वर्षांत तीन हजार ७२२ नक्षली हल्ले

गेल्या ९ वर्षांत म्हणजे २०११ ते २०२०पर्यंत छत्तीसगडमध्ये तीन हजार ७२२ नक्षलवादी हल्ले झाले असून त्यात ४८९ जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती २०२१मध्ये गृहमंत्रालयाने लोकसभेत दिली होती.

सामान्य नागरिक ठार

सन २०११ ते २०२० दरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यांत नक्षलवाद्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिक ठार झाल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत सुरक्षारक्षकांनी ६५६ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले होते. तर दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी ७३६ सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला. सुरक्षारक्षकांनी २०१६मध्ये सर्वांत जास्त नक्षलवाद्यांची हत्या केली होती. त्यावेळी १३५ नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते. त्यानंतर २०१८मध्ये १२५ नक्षलवादी मारले गेले.

Exit mobile version