कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

प्रवासी साखर झोपेतच असतानाच काळाने घातला घाला

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले. पुणे-बंगळुर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ बस ट्रकवर आदळल्याने हा दुर्दैवी भीषण अपघात झाला. सर्व प्रवासी साखर झोपेतच असतानाच रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास काळाने हा घाला घातला. काही कळण्याच्या आतच प्रवाशांना मृत्यूने गाठले.

ठाण्यातील ही खासगी बस ठाण्यातील साताऱ्याहून डोंबिवलीकडे निघाली होती. पुणे-बंगळुर महामार्गावरील स्वामीनारायण मंदिराजवळ बस आली असता येताच मागून येणाऱ्या ट्रकने त्यावर धडक दिली. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो ट्र्क बसला जाऊन धडकला , असे पोलिसांनी सांगितले. या ट्रकमधून साखरेची मालवाहतूक करण्यात येत होती. प्रवासी बसमध्ये एकूण २१ प्रवासी, १ ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण २३ जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, २ मालक असे एकूण ३ जण होते

या अपघातात बसमधील तीन प्रवासी आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी झाले.मृत्यू झालेल्यांमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले. अपघातातील ३ जखमी प्रवाशांना पुण्यातील नवले हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटलसह विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

काँग्रेसने ७० वर्षात एकाच देशात दोन देश निर्माण करण्याचे काम केले

अतीक अहमद, अश्रफच्या हत्येचा बदला घेणार

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या भोजपुरी अभिनेत्रीचा पर्दाफाश

रात्रीच्या अंधारात मदतकार्यात अडथळे आले. मात्र प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे यांची ओळख पटकावण्याचे काम अद्याप सुरु आहे.

 

Exit mobile version