राजस्थानमधील दौसा येथे बसचे नियंत्रण सुटून रेल्वे रुळावर पडल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे.सोमवारी साक्ली ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून किमान २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे.बसमध्ये एकूण ३० हुन अधिक प्रवासी होते.ही बस हरिद्वारहून उदयपूरला जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
राजस्थानमधील दौसा येथे सोमवारी पहाटे २:१५ च्या सुमारास हा अपघात झाला.बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ओव्हरब्रीजवरून रेल्वे रुळावर पडली.या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला तर अधिक जण जखमी झाले आहेत.बस ३० हून अधिक प्रवासी घेऊन हरिद्वारहून उदयपूरला जात असताना हा अपघात झाला.अपघातानंतर, २८ लोकांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी
दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!
इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!
गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!
डॉक्टर जखमींवर उपचार करत आहेत. एसडीएमला घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे,” असे दौसा येथील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी राजकुमार कासवा यांनी सांगितले.दौसा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही घटना घडली. ही बस पहाटे २:१५ च्या सुमारास दौसा येथील ओव्हरब्रिजवरून रेल्वे रुळावर पडली , असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.