महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली असून यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनही सज्ज झाले आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत असून गैरव्यवहाराचा पैसा, मद्य, धातू यांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी जागोजागी नाकेबंदी करण्यात आली आहे. चौक्या उभ्या करून तपासणी केली जात आहे. आचारसंहितेदरम्यान छापे टाकून निवडणूक आयोगाच्या पथकाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, मराठवाडा सर्वत्र कोट्यवधींचा पैसा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबई आणि पालघरमध्ये अशीच मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. पालघरमधून सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघरच्या वाड्यातून तीन कोटी सत्तर लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वाड्याकडून विक्रमगडकडे जाणारे संशयास्पद वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली. त्या वाहनात कोट्यवधींची रोकड असल्याचे आढळून आले. हे वाहन नवी मुंबईतील ऐरोली येथून रोख रक्कम घेऊन वाडा, जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा..
काँग्रेसने घोटाळे करण्यात स्वतःचेचं रेकॉर्ड्स मोडलेत
रामगिरी महाराज, नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न, मुस्लीम आरक्षण आणि बरच काही…
‘एक हैं तो सुरक्षित हैं’ बरोबर आता आरएसएसची ‘सजग रहो’ मोहीम
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘संकल्प पत्र’ उद्या जाहीर होणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पालघरच्या वाडा येथील वाडा पाली रस्त्यावर नाकाबंदी करून तपास करत असलेल्या वाडा पोलिसांना विक्रमगडकडे जाणारी एक संशयास्पद गाडी दिसली. वाडा पोलिसांनी कसून चौकशी केली असता कारमध्ये तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. गाडीत पैसे कोणाचे होते आणि कुठे जात होते? वाडा पोलीस सध्या त्याचा तपास करत आहेत. याआधीही तलासरी पोलिसांनी महाराष्ट्र- गुजरात सीमेवर ४ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.