जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम आणि ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रंसुद्धा सापडली आहेत.

जालन्यात ३९० कोटींचं घबाड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

जालना जिल्ह्यात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार स्टील कारखानदारांच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत आयकर विभागाने ३९० कोटींचं घबाड जप्त केलं आहे.

जालन्यातील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती. त्यानुसार, स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकले. जवळपास आठ दिवस ही कारवाई सुरु होती.

ही वाचा:

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

कारखानदारांची घरे, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. चार स्टील कारखानदारांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम आणि ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रंसुद्धा सापडली आहेत. रोख रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना जवळपास १३ तास लागले असून, १२ मशिन्स रोख रक्कम मोजण्यासाठी मागवल्या होत्या. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईच सहभागी झाले होते. चार कारखानदारांमध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

Exit mobile version