जालना जिल्ह्यात बेकायदेशीररित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द

अंबड तालुक्यातील २०२४ वर्षात देण्यात आलेले सर्व १७६० जन्म प्रमाणपत्र रद्द

जालना जिल्ह्यात बेकायदेशीररित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द

राज्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्याविरुद्ध भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. यासंदभार्त त्यांनी आकडेवारीसह तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीर रित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या लढ्याला यश मिळताना दिसत आहे.

जालना जिल्ह्यात नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीर रित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. तर महत्त्वाची बाब म्हणजे अंबड तालुक्यातील २०२४ या वर्षात देण्यात आलेले सर्व १७६० जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. शिवाय आकडेवारीनुसार, बदनापूर तहसील मधून ४४५ अर्ज, भोकरदनमधून ६७४, जाफ्राबाद येथून ३९४ जन्म प्रमाणपत्र अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

दिल्लीतील न्यायाधीशांच्या बंगल्याला लागलेल्या आगीनंतर सापडली बेहिशेबी रोकड

वीजपुरवठा खंडित झाल्याने लंडनमधील हीथ्रो विमानतळ बंद

मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक

हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बदर खानच्या हद्दपारीला स्थगिती

नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने वितरित झालेली जालना जिल्ह्यातील ३५०० जन्म- मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्ष २०२४-२५ या कालावधीत वितरित केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची चौकशी होईल. यात अफरातफर आढळल्यास दोषींवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही याच विषयावर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांची भेट घेतली. त्यांनी जन्म- मृत्यूच्या बोगस नोंदींच्या चौकशीची मागणी केली आणि शासननियमातील मार्गदर्शक सूचना दाखवल्या. त्यावर डॉ. पांचाळ यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

अनिल परबांनी पायावर धोंडा पाडून घेतला ! | Mahesh Vichare | Chitra Wagh | Anil Parab | Sanjay Rathod

Exit mobile version