27 C
Mumbai
Thursday, November 21, 2024
घरक्राईमनामाबँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

ईडीची दिल्ली, महाराष्ट्रात कारवाई

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने गुरुवार, २० जून रोजी मोठी कारवाई केली आहे. २० हजार कोटींहून अधिक रुपयांच्या कथित बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे ३५ ठिकाणी ईडीने झडती घेतली. अरविंद धाम, गौतम मल्होत्रा ​​यांच्यासह अमटेक ग्रुप आणि त्याच्या संचालकांवर छापे टाकण्यात येत आहेत.

गुरुवारी सकाळपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे ३५ व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, या फसवणुकीमुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १० ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रिअल इस्टेट, परकीय गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांमध्ये गुंतवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार झाली आहे. शेल कंपन्यांच्या नावावर एक हजार कोटींची मालमत्ता जमा करण्यात आली आहे. काही परकीय मालमत्ता तयार केल्या गेल्या आहेत आणि पैसा अजूनही नवीन नावाने ठेवला आहे.

हे ही वाचा..

नाटकात प्रभू श्रीराम, सीतामातेचा अपमान करणाऱ्या विद्यार्थ्यांना १.२ लाखांचा दंड

केवळ ६ हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना दिला आश्रय!

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी!

दिल्ली अबकारी प्रकरणात १०० कोटी रुपयांची मागितली लाच!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा