साकीनाका येथे झालेल्या अत्यंत घृणास्पद बलात्कारासंदर्भात पोलिसांनी ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दिंडोशी न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र मंगळवारी दाखल केले. ही घटना घडल्यानंतर १८ दिवसांनी पोलिसांनी सर्व तपास पूर्ण करून हे आरोपपत्र तयार केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ७७ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत.
अट्रोसिटी ऍक्ट, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर हा बलात्कार झाला होता. दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या बलात्कार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला. राज्यभरातून त्यावर प्रचंड संताप व्यक्त झाला होता. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली गेली.
हे ही वाचा:
पंतप्रधानांनी लोकार्पण केले ३५ प्रकारच्या पिकांचे वाण
महाराष्ट्रातील मोफत शिवभोजन थाळी झाली बंद; आता मोजा इतके पैसे
सिद्धूंच्या राजीनाम्याने वाढली अर्चना पूरणसिंगची चिंता!
‘परब यांनी आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर…’
मोहन चौहान असे त्या नराधमाचे नाव आहे. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली होती. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महाराष्ट्रात पुणे, अमरावती, मुंबई अशा विविध ठिकाणी झालेल्या बलात्कारांच्या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्यावरूनही राज्यपालांवर सरकारच्या वतीने टीका करण्यात आली होती.