रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

सुरक्षा रक्षकाला कळले आणि...

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

मरीन ड्राईव्ह येथील एका रुग्णालयात रुग्ण असल्याचे भासवून एका ३२ वर्षीय व्यक्तीने प्रवेश करून त्या रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या  बाथरूममधील उच्च प्रतीचे पाण्याचे नळ चोरल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरळी येथील रहिवासी रंजन परब याने १६,००० रुपये किमतीचे चार उच्च प्रतीचे नळ ज्यामध्ये गरम आणि थंड पाणी दोन्हीही मिसळले जाऊ शकते ते चोरले होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, रंजन हा एक रुग्ण म्हणून या रुग्णालयात दाखल झाला होता. वरच्या मजल्यावरील बाथरूममध्ये त्याने प्रवेश करून आतून दरवाजा लावून घेतला आणि आपल्याकडील उपकरणे वापरून त्याने पाण्याचे नळ काढून चोरले.

या रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक यांना एक व्यक्ती खूप घाईघाईत जाताना आढळल्यावर त्यांनी त्याची चौकशी करून त्याला थांबायला सांगितले तेव्हा तो पळू लागला, त्याची पिशवी बघितली असता त्यात त्या रक्षकाला चार उच्च प्रतीचे नळ बघून सगळ्यांनाच धक्का बसला. रंजनकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेव्हा त्याने आपण पाचव्या माळ्यावरील बाथरूम मधून हे नळ चोरल्याचे काबुल केले. तक्रारदाराने नीट तपासले असता आणखी पाचव्या, आठव्या आणो नवव्या माळ्यावरील एकूण १२ नळ गायब असल्याचे लक्षात आले आहे.

हे ही वाचा:

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उपयोग ‘राष्ट्रवादी’साठी…केतकी चितळेचा घणाघाती आरोप

बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराने केली टीका

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

एकूण नळांपैकी आत्ता चारच नळ सापडले आहेत, बाकी नळांचा तपास सुरु आहे. एकूण तपासावरून असे दिसते की, आरोपीने याआधीसुद्धा रुग्णालयातून जाऊन नळ चोरले असावेत. त्याचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता , याआधी त्याने चेंबूर येथे चोरी केल्यामुळे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत, तर चुनाभट्टी आणि मालाड या सुद्धा पोलीस स्थानकात त्याच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहेत.

Exit mobile version