थायलंड मधील एका पाळणा घरात झालेल्या सामूहिक हत्याकांडमध्ये अंदाजे ३२ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये मुले आणि वयस्कर यांची संख्या जास्त आहे. हा सर्व प्रकार एका पोलीस अधिकाऱ्याने घडवला असून त्याने स्वतःलाही गोळी मारलेली आहे. ही घटना थायलंडच्या पूर्वोत्तर भागात घडलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. अंधाधुंद गोळीबारामुळे या भागात झीटीचे वातावरण निर्माण झाले आहे .
थायलंड मधील लॉंग बुवा लांबू या भागातील एका पाळणा घरामध्ये सामूहिक गोळीबाराचा प्रकार घडला. या गोळीबारात आतापर्यंत ३२ लोक ठार झाले ते सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये २३ मुलं, दोन शिक्षक आणि एक पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. बंदुकधारी जेवणाच्या सुमारास पाळणाघरात आले. त्यावेळी तेथे ३० मुले होती, असे जिल्हा अधिकारी जिदापा बूनसम यांनी सांगितले. त्या व्यक्तीने प्रथम चार ते पाच कर्मचाऱ्यांना गोळ्या घातल्या, ज्यात आठ महिन्यांची गरोदर असलेल्या एका शिक्षिकेचा समावेश होता. लोकांना आधी फटाक्यांची आतषबाजी सुरु असल्याचे वाटले हाेते.
पाळणा घरामध्ये ३२ लोकांची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या मुलांना आणि पत्नीला देखील गोळी मारून ठार केले आहे. आरोपी स्वतः एक पोलीस अधिकारी आहे . ड्रग प्रकरणामध्ये या अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले. गोळीबार गेल्यानंतर आरोपी एका कारमधून फरार झालेला आहे या हल्ल्यात बंदूकधाऱ्याने चाकूचाही वापर केला होता.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
या गोळीबाराच्या घटनेनंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी तपास संस्थांना कारवाई करून आरोपीला पकडण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. थायलंडमध्ये या अगोदर २०२० मध्ये सामूहिक हत्याकांडाचा प्रकार घडला होता त्यावेळी मालमत्ता व्यवहाराप्रकरणी एका सैनिकाने २९ लोकांची गोळ्या मारून हत्या केली होती. या घटनेमध्ये ५७ लोक जखमी झाले होते. थायलंडमध्ये सामुहिक गोळीबार दुर्मिळ मानला जातो.