शरद पवारांचे निकटवर्ती, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची ३१५ कोटींची संपत्ती जप्त

मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल

शरद पवारांचे निकटवर्ती, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची ३१५ कोटींची संपत्ती जप्त

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची तब्बल ३१५.६ कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांनी जप्त केली आहे. यापूर्वी शरद पवारांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादीचे पंधरा वर्षे खजिनदार असलेले आणि राज्यसभा सदस्य असलेले ईश्वरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष जैन यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने छापेमारी केली होती. या धाडी महाराष्ट्रात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरातमधील कच्छ या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या. या धाडसत्राला महिना पूर्ण होत असतानाचं ईश्वरलाल जैन यांची तब्बल ३१५.६ कोटींची चल आणि आचल संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

कारवाई करताना प्रामुख्याने ईडीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की संबंधितांवर कारवाई करताना त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन यांनी बँकेत गहाण ठेवून जे पैसे घेतले होते ते पैसे इतर कामाला वापरले शिवाय बँकेत गहाण ठेवलेल्या जमिनींची देखील परस्पर विल्हेवाट लावली आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोइत्रा यांनी घेतली लाच?

ट्रकला आरटीओने महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन अधिकारी अटकेत

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

ईश्वरलाल जैन हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ते १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष होते. शिवाय राज्यसभेचे खासदारही होते. त्यांचे पुत्र मनीष जैन हे माजी आमदार असून राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुखही आहेत.

Exit mobile version