देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे काही महिन्यांपूर्वी लव्ह जिहादची एक धक्कादायक घटना घडली होती. दिल्लीत लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर नावाच्या तरूणीची तिच्या प्रियकराने हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. आफताब पूनावाला हा या प्रकरणी आरोपी होता. अशातच दिल्ली पोलिसांनी मंगळवार, २८ मे रोजी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ३ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आरोपी आफताब पूनावाला याच्याविरुद्ध सापडलेले ठोस पुरावे नमूद केलेले आहेत.
श्रद्धा हिचा तेव्हा तिच्या वडिलांशी कोणताही संपर्क नव्हता. काही महिने आफताब आणि श्रद्धा एकत्र राहिले. पण त्यांच्यात भांडणे होऊ लागली. तिने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने संतापून तिचा खून केला. या प्रकरणी आता पोलिसांनी ३ हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात तपासादरम्यान गोळा केलेल्या अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
डिजिटल पुराव्यामध्ये आफताब पूनावालाच्या गुगल लोकेशन हिस्ट्रीचा समावेश आहे, त्याने ज्या ठिकाणी शरीराचे तुकडे टाकले त्या ठिकाणांशी सबंधित आहे. यात श्रद्धा वालकरच्या फोनच्या गुगल लोकेशनचाही समावेश आहे. शिवाय हा फोन दोनदा मुंबईत कसा पोहोचला आणि आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्याची हिस्ट्री कशी गायब झाली हेही दाखवण्यात आले आहे. आरोपी आफताब पूनावाला याच्यावर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. साकेत न्यायालयात महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Shraddha murder case: Delhi Police files supplementary chargesheet, contains scores of digital and forensic evidence
Read @ANI Story | https://t.co/Ve4RyJBNMZ#DelhiPolice #ShraddhaMurderCase #SupplementaryChargesheet pic.twitter.com/6LNcZsCrNF
— ANI Digital (@ani_digital) May 28, 2024
हे ही वाचा:
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!
पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज
दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये
आफताब पूनावाला याला १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. आर्थिक कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याचे समोर आले होते. या भांडणानंतर पूनावालाने १८ मे २०२२ रोजी संध्याकाळी २७ वर्षीय श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी होती. दोघेही मुंबईत डेटिंग ॲप ‘बंबल’च्या माध्यमातून भेटले होते.