मुंबई पोलिसांकडून ३०० कोटींचा एमडी जप्त

नाशिक मध्ये एमडीचा कारखाना उध्वस्त

मुंबई पोलिसांकडून ३०० कोटींचा एमडी जप्त

१० ग्रॅम मेफेड्रोनसह (एमडी) अटक करण्यात आलेल्या इसमाच्या तपासातून साकीनाका पोलिसांनी नाशिक शहरातील एका फॅक्टरीमध्ये छापा टाकून सुमारे १५० किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली असून नाशिक येथील या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी हा अमली पदार्थ तयार करून त्याचा पुरवठा मुंबई सह संपूर्ण राज्यात करण्यात येत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

साकीनाका पोलिसांनी एमडी तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३०० कोटी २६ लाख एवढी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

साकीनाका पोलिसांनी सर्वात प्रथम या परिसरातून १० ग्रॅम एमडी सह अनवर अफसर सय्यद (४०) याला अटक केली होती. त्याच्या कडे कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने हा एमडी धारावीतून जावेद आयुब खान (२७) या ड्रग्स विक्रेत्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी धारावी येथून जावेद सय्यद,आसिफ शेख (३०), इकबाल मोहम्मद अली (३०) या तिघांना अटक करून त्यांच्याकडे पोलिसांना ९० ग्रॅम एमडी सापडला. हे तिघे धारावीत राहणारे असून धारावीतील सुंदर राजन शक्तीवेल (४३), हसन सुलेमान खान (४०), आयुब सत्तार सय्यद (३२) यांच्याकडून खरेदी करून त्याची विक्री छोटे मोठे विक्रेते यांना विकत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी या तिघांना अटक करून चौकशी केली असता आरिफ शेख याचे नाव समोर आले. आरिफ शेख हा हैद्राबाद गेल्याचे कळताच साकीनाका पोलिसांचे पथक हैद्राबाद येथे रवाना झाले आणि आरिफ शेख याला अटक करून मुंबईत आणण्यात आले. या सर्व तपासात कल्याण शिळरोड येथून असमत अन्सारी याला १५ किलो एमडीसह अटक करून पोलीस पथक मुख्य पुरवठादाराच्या शोधात नाशिक येथे रवाना झाले.

हे ही वाचा:

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

नाशिक एमआयडीसी येथील एका फॅक्टरीत एमडी तयार करण्यात येत असून तेथून संपूर्ण राज्यभर एमडीचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने साकीनाका पोलिसांनी फॅक्टरीवर छापा टाकून १३३ किलो एमडी हा अमली पदार्थांच्या साठयासह जिशान शेख याला अटक केली.

Exit mobile version