वरळी वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या कोस्टल रोडवर ३० वर्षाच्या तरुणाने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दर्शित राजभाई शेठ असे या तरुणाचे नाव आहे. दर्शित हा मालाड येथे राहणारा असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दर्शितच्या आई, बहिणीसह पत्नीचा पोलिसांकडून लवकरच जबाब नोंदविण्यात येणार आहे. या जबाबनंतर त्याच्या आत्महत्येबाबत खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मालाडचा रहिवाशी असलेला दर्शित हा बीकेसी येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. सायंकाळी तो कामानिमित्त वरळी सी लिंकवर त्याची हुंडाई कार 20 घेऊन गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता तो वरळी सी लिंकवरुन कोस्टल रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आला होता. कार बाजूला उभी करून त्याने समुद्रात उडी घेतली होती. ही माहिती काही वाहन चालकाकडून समजताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नौसेना, अग्निमशन दलासह सागरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नव्हता. अंधारामुळे ही शोधमोहीम नंतर थांबविण्यात आली होती.
बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह वरळी पोलिसांना सापडला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याच्या कारमध्ये पोलिसांना काही दस्तावेज आणि मोबाईल क्रमांक सापडला होता. या कागदपत्रांसह मोबाईलवरुन त्याची ओळख पटवण्यात आली. याची माहिती त्याच्या कुटूंबियांना देण्यात आली, दर्शितकडे पोलिसांना कुठलीही सुसाईट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. मात्र दर्शित काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
हे ही वाचा:
भरवेगात स्कुटी चालविणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाची हत्या
भारतीय विद्यार्थी बदर खान अमेरिकेत करत होता हमासचा प्रचार; केली अटक
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा
दिल्लीमधील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासून महाराणा प्रताप यांचा लावला फोटो
प्राथमिक तपासात दर्शित सध्या त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याची पत्नीचीही जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यू नोंद करुन तपास सुरु केला आहे.