एका ८२ वर्षीय अनिवासी भारतीय असलेल्या डॉक्टरच्या घरातून तब्बल ४० लाखांच्या सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरल्याप्रकरणी तीन मोलकरणींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी चोरीला गेलेली बहुतांश मालमत्ता जप्त केली आहे. चोरीची घटना २१ एप्रिल ते ६ मे दरम्यान घडली.या ज्येष्ठ महिला परदेशात राहतात. मात्र त्या दरवर्षी काही महिन्यांसाठी भारतात येतात आणि त्यांच्या वांद्र्याच्या हिल रोडवरील घरात राहतात. त्यांचा धाकटा भाऊ आणि बहीण त्याच उपनगरात राहतात. १८ जानेवारी रोजी या महिला मुंबईत आल्या होत्या. तेव्हा त्यांनी तिचे काही दागिने विकण्याचा विचार केला.
त्यासाठी त्यांनी एका स्थानिक सराफाशी संपर्क साधून त्याला दागिने दिले. त्यांना अमेरिकेत परतायचे असल्याने या सराफाने तिच्या भावंडांना या दागिन्यांचे पावणे चार लाख रुपये दिले. दोन्ही भावंडांनी हे पैसे या महिलेच्या घरामधील लाकडी कपाटात ठेवले होते.या कपाटात सोन्याची नाणी, बांगड्या आणि अंगठ्यांसह इतर मौल्यवान वस्तूही होत्या. भावंडांनी कपाटाला कुलूप लावले आणि चाव्या त्याच घरामधील ड्रॉव्हरमध्ये ठेवल्या. २१ एप्रिल रोजी या ज्येष्ठ महिलेने गुलजार शेख आणि निर्मला कांबळे या दोन मोलकरणींना बोलावून फ्लॅट साफ करण्यास सांगितले.
हे ही वाचा:
मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !
राज ठाकरे, ही धरसोड नाही… हे आधीच ठरले होते!
कुठे आहे विरोधी ऐक्य? कर्नाटक शपथविधीला सोनिया, ममता आणि ठाकरे गैरहजर !
सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?
याआधीही या महिलांनी त्यांच्यासाठी काम केल्याने या महिलेचा त्यांच्यावर विश्वास होता.शेख आणि कांबळे यांनी या महिलेच्या भावाकडे घराची चावी मागितली. त्यावेळी त्यांनी घराची स्वच्छता करून चाव्या परत केल्या. परंतु ६ मे रोजी, या महिलेच्या भावंडांनी कपाट तपासले असता मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम गायब झाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून कोणताही सुगावा मिळाला नाही.
वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे आणि सहाय्यक निरीक्षक बजरंग जगताप यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने खबऱ्यांद्वारे धारावीत या मोलकरणींचा माग काढला. मोलकरणींनी घराच्या डुप्लिकेट चाव्या करून आणि सहकारी अनिशा शेख हिच्यासोबत अनेक दिवस घरात फिरून मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.