पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांनी एका चकमकीत लश्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत लश्करचा पाकिस्तानातील कमांडर एजाज ऊर्फ अबु हुरैराचाही खात्मा करण्यात आला आहे. या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणवार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

काश्मीर पोलिसांना काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या टीमने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यानंतर अतिरेक्यांवर जोरदार गोळीबार केला ज्यामध्ये हे तीन अतिरेकी ठार झाले.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका झाडाखाली स्फोटकं (आयईडी) लपवली होती. सुरक्षा दलाने हे आयईडी निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काजीगुंड परिसरात दामेजन गावाच्या बाहेरच्या परिसरात झाडाखाली आयईडी लपवण्यात आले होते. सुरक्षा दल आणि केंद्रीय राखवी दलाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घेराबंदी केली. घटनास्थळी बॉम्ब निरोधक पथकालाही बोलावण्यात आलं. त्यानंतर आयईडी निष्क्रिय करून तिथेच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच

पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?

‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

या आधी ८ जुलै रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याला ठार करून पाच वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात काही भाग बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं. हे दोन्ही अतिरेकी लश्कर ए तोयबाचे असल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version