मित्राच्या मृत्युनंतर त्याचे ३ कोटी हडपले; गुन्हा दाखल

त्या माणसाने महिलेकडून ३.३ कोटी रुपय घेतल्यावर ती रक्कम परत करायला टाळाटाळ करत असल्याचे ही समोर आले आहे.

मित्राच्या मृत्युनंतर त्याचे ३ कोटी हडपले; गुन्हा दाखल
सायन मध्ये एका २५ वर्षीय महिलेने तिच्या आजोबांच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवली. त्या माणसाने महिलेकडून ३.३ कोटी रुपय घेतल्यावर ती रक्कम परत करायला टाळाटाळ करत असल्याचे ही समोर आले आहे. या माणसावर त्या महिलेने तक्रार देखील नोंदवली आहे.
मैत्री शहा असे त्या महिलेचे नाव असून ती सायनची रहिवासी आहे. तिच्या आजोबांनी त्यांची पनवेलची फॅक्टरी विकली आणि सगळी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली ज्याची नॉमिनी मैत्री स्वतः होती. नंतर ती रक्कम संपूर्णतः जितेंद्र शाह, जे त्यांच्या फॅक्टरीतील  विश्वासू भागीदार होते त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. ती रक्कम आजोबांनी जितेंद्रला त्यांच्या कुटुंबासाठी दिली होती. थोडा वेळा नंतर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. मैत्रीचा आरोप आहे की जितेंद्रने ही रक्कम त्याच्या साथीदारांच्या खात्यात ट्रान्सफर केली. मैत्रीच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर तिच्या आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण जितेंद्रने पैसे परत केले नाहीत, त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला.

हे ही वाचा : 

‘या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

अखेर इराणने हिजाब कायदा बदलण्याचा घेतला निर्णय

जुळ्या बहिणींशी लग्न करणं तरुणाला भोवणार

ईडीकडून अकरा कोटींची सुपारी जप्त

जानेवारी २०२१ मध्ये मैत्रीच्या आजीने सायन पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. मयत आजोबांचे लेखापाल जितेंद्र आणि  हरीश ठक्कर यांचे जबाब नोंदवण्यात आले. ठक्कर यांनी आजी आणि मैत्रीच्या देखभालीसाठी जितेंद्रच्या ताब्यात पैसे असल्याची पुष्टी केली. मैत्रीच्या आजीचे निधन झाल्यानंतर तिने जितेंद्रकडे पैसे मागितले, मात्र त्याने ते परत करण्यास नकार दिला. ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी जितेंद्र आणि त्याच्या चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्याला आधी रक्कम कोर्टात जमा करून सायन पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले.
Exit mobile version