नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईत नववर्षाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे ३ कोटी १८ लाख रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि अंमलीपदार्थ विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अंमलीपदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना बीकेसी भागात एक आफ्रिकन व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसला. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १०५ ग्राम कोकेन, तर १२० ग्राम मोफेड्रिन ड्रग्स सापडले. इबे माईक असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या आरोपीची सखोल चौकशीत केली असता त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. तसेच ड्रग्ज त्याला त्याच्या दोन आफ्रिकन साथीदारांनी विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

हे ही वाचा:

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

आयसीसीच्या ‘या’ खास पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन

लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?

माईक या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईतील वाशी नाका येथे धाव घेत आणखी दोन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले. ओडिफे आणि मंडे अशी त्यांची नावे असून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडेही मोठा ड्रग्ज साठा सापडला. या तिघांकडे मिळून २२५ ग्राम कोकेन, १५०० ग्राम मेफेड्रीन आणि २३५ ग्राम एमडीएमए सापडले आहे. या सर्व ड्रग्सची किंमत सुमारे ३ कोटी १८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version