तीन बांगलादेशी नागरिकांना रविवारी (२२ डिसेंबर) त्रिपुराच्या आगरतळा रेल्वे स्थानकावर भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली, असे आगरतळा सरकारी रेल्वे पोलिसांचे प्रभारी अधिकारी (OC) यांनी सांगितले. आगरतळा सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी), रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईनंतर ही अटक करण्यात आली.
छोटन दास (१९) आणि नोआखली येथील बिष्णू चंद्र दास (२०) आणि हबीगंज येथील मोहम्मद मलेक (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे तिघे दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते, प्राथमिक तपासात त्यांचे गंतव्यस्थान कोलकाता असल्याचे समोर आले आहे.
अटकेनंतर संशयितांना पुढील चौकशीसाठी आगरतळा जीआरपी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. अधिका-यांना संशय आहे की या प्रकरणाशी आणखी काही लोक जोडले गेले आहेत आणि आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आगरतळा जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी अधिक माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा :
फडणवीस-भुजबळांची भेट, १०-१२ दिवसात तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर लिखित ‘गानसरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार!’चे शनिवारी प्रकाशन
ट्रम्प टीममधील AI साठी वरिष्ठ धोरण सल्लागारपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे श्रीराम कृष्णन कोण आहेत?
मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी