24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामावाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?

वाशीमध्ये उपचारादरम्यान तरुणीवर बलात्कार?

Google News Follow

Related

पुण्यातून वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका २८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या चर्चेमुळेच सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या शिरुर येथे राहणाऱ्या या तरुणीला साधारण आठ दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. पुण्यात कोणत्याही रुग्णालयात या तरुणीला बेड मिळाला नाही. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळे ओळखीच्या डॉक्टरांनी या तरुणीला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात पाठवले होते.

या तरुणीचे आई-वडीलही कोरोनाग्रस्त आहेत. या तरुणीला रुग्णालयात दाखल करुन घेतल्यानंतर मंगळवारी तिला कोरोना चाचणीसाठी सीबीडी येथे पाठवण्यात आले. यावेळी तिच्यासोबत तिचे नातेवाईकही होते. मात्र, कोरोना चाचणी करून पुन्हा रुग्णालयात परतत असताना या तरुणीला आकडी आली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या मुलीची तपासणी करत असतानाच डॉक्टरांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना याविषयी कळवले. त्यानंतर प्रकृती अत्यंत खालावली असल्याने या तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता याप्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. रुग्णालयात येण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला होता का, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांवर पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक प्रशासन मुजोर- अतुल भातखळकर

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

कोरोनाची चेन वाढतच आहे

कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या अंधेरीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने शहरातील हॉटेल्सचे रुपांतर कोव्हिड सेंटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा