23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा१४ देशात दडून बसलेत भारतातील २८ वाँटेड गुंड

१४ देशात दडून बसलेत भारतातील २८ वाँटेड गुंड

वाँटेड गुंडांची यादी केंद्राने तयार केली

Google News Follow

Related

भारतातील २८ वाँटेड गुंड १४ वेगवेगळ्या देशांमध्ये लपून भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत. भारताविरुद्ध कट रचणाऱ्या या वाँटेड गुंडांची यादी केंद्राने तयार केली आहे. या २८ गुंडांपैकी नऊ कॅनडात तर पाच अमेरिकेत लपले असल्याची माहिती मिळत आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. या गुंडांमध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार यांचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर अनमोल बिश्नोई उर्फ ​​भानू अमेरिकेत लपला आहे.त्याच्यावर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आणि चित्रपट आणि व्यावसायिक जगतातील प्रमुख व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप आहे. सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनेके, गुरपिंदरसिंग उर्फ ​​बाबा डल्ला, सतवीर सिंग वारिंग उर्फ ​​सॅम, स्नोव्हर धिल्लॉन, लखबीर सिंग उर्फ ​​लंडा, अर्शदीप सिंह उर्फ ​​अर्श डला, चरणजीत सिंह उर्फ ​​रिंकू बिहला, रमनदीप सिंह उर्फ ​​रमन जज आणि गगनदीप सिंग उर्फ ​​गगना हथूर यांचा या नऊ वाँटेड टोळींमध्ये समावेश आहे.

अमेरिकेत लपलेत ५ गुंड

सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार , अनमोल बिश्नोई, हरजोत सिंग गिल, दरमनजीत सिंग उर्फ ​​दरमन खालो आणि अमृत बल हे पाच गुंड अमेरिकेत लपले आहेत. विक्रमजीत सिंग ब्रार उर्फ ​​विकी आणि कुलदीप सिंग उर्फ ​​नवांशरिया हे दोघे संयुक्त अरब अमिरातीमध्ये लपले आहेत.

हे ही वाचा:

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

ठाकरे, राऊत, केजरीवाल सगळेच ठरले ‘अनपढ’!

ग्रीन रिफायनरी कोकणातच उभी राहणार!

व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल

या देशातही आहेत लपलेले

रोहित गोदारा युरोपमध्ये, गौरव पत्याल ऊर्फ लकी पत्याल अर्मेनियामध्ये, सचिन थापन ऊर्फ सचिन बिश्नोई अझरबैजानमध्ये, जगजीत सिंग ऊर्फ गांधी आणि जॅकपाल सिंग ऊर्फ लाली धालीवाल मलेशियामध्ये लपला आहे. हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा पाकिस्तानध्ये , राजेश कुमार उर्फ ​​सोनू खत्री ब्राझीलमध्ये , संदीप ग्रेवाल उर्फ ​​बिल्ला इंडोनेशिया , मनप्रीत सिंग उर्फ ​​पिटा फिलीपिन्समध्ये , जर्मनीमध्ये सुप्रीत सिंग उर्फ ​​हॅरी चथा, ऑस्ट्रेलियात गुरजंत सिंग उर्फ ​​जनता, आणि रमनजीत सिंग उर्फ ​​रोमी हाँगकाँग मध्ये लपला लपलेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा