बेंगळुरूमधील ४४ हून अधिक शाळांना शुक्रवारी निनावी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या.अचानक बॉम्बची धमकी मिळाल्याने शाळा अधिकारी, विध्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट पसरली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून एकूण ४४ हुन अधिक शाळांना ईमेलद्वारे धमकी मिळाली.बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने पोलिसही अलर्ट होऊन संपूर्ण शाळेची तपासणी केली.बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिल्यांनंतर आमच्या बॉम्ब शोधक पथकाने शाळेतील शाळा आणि सभोवतालच्या परिसराची तपासणी केली.मात्र, आमच्या पथकाला कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी म्हणाले की, हा एक फसवा संदेश आहे.आम्ही तपास करत आहोत.तथापि, पालकांनी घाबरू नका, असे पोलिसांनी सांगितले.तसेच अशा प्रकारचे फसवे संदेश गेल्यावर्षी देखील अनेक शाळेंना आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
कुठे गेली पाकिस्तानमधून आलेली अंजू? मुलांनीही भेटण्यास दिला नकार
विजेचे बिल होते चार हजार रुपये; जमा झाले १९७ कोटी!
हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!
‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही बेंगळुरू येथील एका शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.ते म्हणाले, शाळांना धमकी आल्याचे मी टीव्हीवर पाहिले.यापैकी माझा घरासमोर असण्याऱ्या शाळेचाही उल्लेख करण्यात आल्याने मी वैतागलो.तपासासाठी मी स्वतः घरा बाहेर पडलो.पोलिसांनी मला धमकीचा मेल दाखवला.प्रथमदर्शनी हा मेल बनावट असल्याचे दिसून आले.परंतु पोलिसांना मी सांगितले की, आपण सावध राहिले पाहिजे, ते पुढे म्हणाले.विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले आहेत.परंतु पालकांना घाबरण्याची गरज नाही, पोलीस याकडे लक्ष देत आहेत, ते म्हणाले.
शिवकुमार यांनी पालकांना सांगितले की, आपण काळजी करू नका, आपली मुले सुरक्षित राहतील.काही खोडकरांनी हे केले असावे, २४ तासात त्यांना आम्ही पकडू.सायबर पोलीस आपले काम करत आहेत.आपणही सावध असले पाहिजे आणि दुर्लक्ष करून चालणार नाही, ते पुढे म्हणाले.