राज्यात ड्रग्ज तस्करीच्या कारवायांनी जोर धरला आहे. त्यातच आता मुंबईच्या कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेतून मुंबईत ड्रग्जची कारवाई केली जात होती. दरम्यान कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेतून मुंबईत कुरिअरच्या माध्यमातून मारीजुआणा ड्रग्जची तस्करी करण्यात येत होती. तेव्हा कारवाईदरम्यान तब्बल २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईत मास्टरमाइंड असणाऱ्या आरोपीला कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या घरात शोधकार्य केले असता घरातून २० किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले.
हे ही वाचा:
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
रशियाने दोन देशांची काढली ‘हवा’
पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी
दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १.१ कोटी रुपयांचे २ किलो सोने जप्त केले. सोने शूजमध्ये लपवून तस्करी चालू होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी १.१ कोटी रुपये किंमतीचे १ हजार ६७ ग्रॅम आणि १ हजार ६८ ग्रॅम सोन्याचे १८ बार जप्त केले. त्यापूर्वी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटारी सीमेवर मोठी कारवाई केली होती. कारवाई दरम्यान पकडलेल्या ट्रकमधून लाकडामध्ये लपवलेले तब्बल ७०० कोटींचे १०२ किलो हेरॉईन सापडले होते.