गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाची कारवाई

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

जळगाव येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने गांधीधाम एक्स्प्रेसमधून तब्बल २६ किलो गांजा जप्त केला आहे. अकोला ते भुसावळ दरम्यान ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी केली असता त्यात हा गांजा आढळून आला.

रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे श्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच त्यांच्याकडील श्वानाला उग्र वास आला त्यामुळे त्याचा पाठलाग करत ते कोच क्रमांक एस ९ मध्ये पोहचले. तेव्हा या डब्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या.

त्यांनी ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षामार्फत वरिष्ठांना कळवून या गोण्या भुसावळ स्थानकात फलाट क्रमांक ४ वर उतरविल्या. पुढे या गोण्यांची तपासणी झाली असता त्यात २६ किलो गांजा आढळून आला असून त्याची किंमत २ लाख ६२ हजार आहे.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?

गोण्यामधील हे १३ बंडल उघडले असता त्यामधून आंबट उग्रवास आणि बिया असलेला ओला गांजा दिसला. या गांजाचे वजन २६.२५८ किलो असून त्याची अंदाजे किंमत २ लाख ६२ हजार ५८० रुपये एवढी आहे. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त (भुसावळ) अशोककुमार, आरपीएफ निरीक्षक राधा किशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. आर. तरड यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version