मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोन, २२ सोनसाखळ्यांची चोरी

चोरटे दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्यातून चोरी करण्यासाठी मुंबईत आले

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत २५० मोबाईल फोन, २२ सोनसाखळ्यांची चोरी

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लालबाग आणि गिरगाव येथून २५० मोबाईल फोन आणि २२ सोनसाखळ्या चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. काळाचौकी, गिरगाव मधील व्ही.पी.रोड आणि डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.

लालबाग येथून निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जवळपास ६४ मोबाईल फोन आणि २२ सोनसाखळी चोरी केल्या आहेत. तसेच गिरगाव येथून चौपाटीकडे निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकी ८९ मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल झाल्या आहेत. तसेच गिरगाव चौपाटीवर कडक पोलीस बंदोबस्तात देखील चोरट्याकडून जवळपास ९९ मोबाईल फोन लांबविण्यात आले आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. ही आकडेवारी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘या’ देशांमध्ये पेजर्सचा अजूनही होतोय वापर, वापरण्याची कारणेही आलीत समोर!

मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली

गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले

‘एक देश, एक निवडणूक’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल!

दरम्यान मागील दहा दिवसाच्या गणेश उत्सवा दरम्यान काळाचौकी पोलिसांनी ८ चोरट्यांना अटक केली असून हे चोरटे दिल्ली आणि उत्तर प्रदेश राज्यातून चोरी करण्यासाठी मुंबईत आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.तसेच दादर आणि जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन चोरीला गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. परंतु स्थानिक पोलिसांकडून आकडेवारी देण्यात आलेली नाही.

गिरगाव चौपाटी येथे विसर्जन दरम्यान गर्दीमध्ये पोलिसांना हरवलेले ३८ लहान मुले तसेच १९ मोठी माणसे मिळून आली होती. पोलिसांनी या सर्वांच्या कुटूंबाचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version