राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत कोल्हापूरमधून मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. करवीर तालुक्यामधील मोरेवाडी परिसरातून राज्य उत्पान शुल्क विभागाने २५ लाख ८६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा आणि ट्रक जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सद्दामहुसेन आदम मुल्ला (वय ३१) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
जिल्हा भरारी पथकाला गुरुवार, १७ मार्च रोजी मोरेवाडी परिसरातील एका इमारतीत बेकायदेशीर मद्यसाठा करून त्याची शहर परिसरात वाहतूक व विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी पथकाने येथे छापा टाकला. आणि शेजारी उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली. तेव्हा यामध्ये २५ लाख ८६ हजार ९२० रूपये किंमतीचे मद्य सापडले. मद्याचे २२८ बॉक्स आणि ट्रक असा एकूण ३० लाख ६७ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त पथकाने जप्त केला.
या प्रकरणात सद्दामहुसेन आदम मुल्ला याला अटक करण्यात आली असून यात आणखी काही साथीदार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही साथीदार आहेत का? याचा तपास सुरू असल्याचे पथक प्रमुख संभाजी बरगे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जपानचे पंतप्रधान येणार भारतात
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला
ही कारवाई संभाजी बरगे यांच्यासह निरीक्षक जगन्नाथ पाटील, कर्मचारी सचिन काळेल, योगराज दळवी, राजेंद्र कोळी, मनोज पोवार, मारुती पोवार, जयदीप ठमके, जय शिनगारे, शिवाजी पाटील यांनी केली.