डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील उंबार्ली गावाच्या परिसरात मानपाडा पोलिसांनी शनिवार, २ जुलै रोजी ४७ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तब्बल २७२ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून हा गांजा ओरिसामधून आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांना उंबार्ली गाव हद्दीत गांजाची विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. एक गाडी उंबार्ली गाव हद्दीतील एका मोकळ्या जागेत येऊन थांबली. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी गाडीजवळ जाऊन चालकाला माहिती विचारली. त्याला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संशय आल्याने पोलिसाने इशारा करताच सापळा लावलेल्या पोलिसांनी गाडीला घेरले. त्यानंतर पोलिसांनी गाडीसह दोघांना मानपाडा पोलीस ठाण्यात आणले.
हे ही वाचा:
अमरावतीतही उदयपूरसारखी घडली घटना, एनआयए करणार चौकशी
धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?
मविआकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी
बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
गाडीची तपासणी केली असता त्यात ४७ लाख किंमतीचा २७२ किलो गांजा सापडला. मोहम्मद आतिफ हाफिज उल्लाह अन्सारी (वय ३२), सलाउद्दीन फारुख ठाकूर (वय २१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून एकूण आठ मोबाईल, गाडी जप्त करण्यात आली आहे.