26 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरक्राईमनामालोकल ट्रेनमध्ये लैंगिक छळ करणारा तरूण अटकेत; चित्रा वाघ यांच्याकडून कारवाईची मागणी

लोकल ट्रेनमध्ये लैंगिक छळ करणारा तरूण अटकेत; चित्रा वाघ यांच्याकडून कारवाईची मागणी

या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय तरुणाला अटक केली आहे

Google News Follow

Related

रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाडहून एक महिला चर्नीरोडला येत असताना बॅाम्बे सेंट्रल-ग्रॅंटरोडच्या आसपास एका अज्ञाताणे चालत्या ट्रेनमध्ये चढून तिच्याशी लगट करायचा प्रयत्न केला पण तिने आरडाओरडा केल्यानंतर तो समोर उभ्या असलेल्या गाडीत उडी मारून पळून गेला.२४ तारखेची ही घटना. त्या विरोधात २८ तारखेला एफआयआर नोंदविला गेल्यानंतर पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही तपासले असता त्याचा चेहरा त्यात दिसला असून त्याला पकडण्यासाठी आरपीएफ व जीआरपी यांच्या टीम कामाला लागल्या.या प्रकरणी पोलिसांनी तपास करत ४० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

चार दिवसांनंतर महिलेने बुधवारी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. भारतीय दंड संहिता कलम ३५४-ए (लैंगिक छळ) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला. ही महिला चर्नी रोड स्थानकावर चर्चगेटला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. ग्रँट रोड स्थानकाजवळ येताच त्या व्यक्तीने तिच्याकडे अश्लील हावभाव केले आणि खाली उतरण्यापूर्वी अश्लील भाषा वापरली, अशी तक्रार पीडितेने केली होती.त्यानंतर पोलसांची आरपीएफ व जीआरपी यांच्या टीमने त्वरित एका ४० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.या तरुणाची अद्याप माहिती आलेली नाही.

हे ही वाचा:

अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद

‘मेक इन इंडिया’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभावशाली परिणाम

८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?

मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन

महिलांवर अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी एका २० वर्षीय महिलेवर मुंबईच्या चालत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता, जेव्हा ती एकटी प्रवास करत होती. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली जेव्हा मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही महिला नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात असताना तिला परीक्षेला बसायचे होते.

चित्रा वाघ यांनी विचारला जाब

या घटनेचा निषेध करत भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजप महिला मोर्चाच्या सहकाऱ्यांसह सहकाऱ्यांसह वेस्टर्न रेल्वेचे DRM नीरज वर्मा यांची भेट घेत अज्ञातावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी रा.९ ते स.६ यावेळेत महिला डब्यात पोलिस सुरक्षा असायलाच हवी आणि ती का नव्हती? जीआरपी मुंबईच्या आयुक्तांनी या प्रश्नाचे द्या? असा प्रश्नही यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. नियमांचं पालन न झाल्यानेच असे कृत्य घडल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

सरकारने महिला मुलींच्या सुरक्षेसाठी बनविलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात व आपल्या कर्तव्यात ज्या अधिकाऱ्याने कसूर केली आहे, त्याच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे,अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे अशा घटनांचेही राजकारण करतात त्यांना मात्र मला ठणकावून एक गोष्ट सांगायची आहे, महिला अत्याचाराच्या घटना या आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर समाजाच्या जबाबदारीचा विषय आहे आणि ही जबाबदारी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने कळते, असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.तत्काळ कारवाई करत आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा