महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल २४ हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे. या महिलांबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्हयांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने कायदे कडक करण्यात येत आहेत.
नॅशनल क्राईम रेकाँर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्यावर्षी राज्यातून ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी जवळपास २४ हजार महिलांचा शोधच लागलेला नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झालीय. तर ४० हजार ०९५ महिला सापडल्या आहेत. त्याशिवाय गेल्यावर्षी राज्यात २ हजार १६३ खून झाले त्यापैकी ५६४ खून महिलांचे झालेत. प्रेमप्रकरणातून ११६ तर अनैतिक संबंधांतून १८३ जणींची हत्या झाली.
हुंड्यासाठीही विवाहितांचे जीव घेतल्याचं दिसून येतंय. या हत्याकांडांमुळे खळबळ उडालीय. गेल्या ११ महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी ९९९ गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी ८५९ गुन्ह्यांची उकल झाली. मात्र १४० मुलींचं गूढ कायम आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप
लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट
आणखी एक मुंडे आता राजकारणात उतरणार!
पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!
बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता झाला पाहिजे. अशी माहिती माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तरात दिली. ते पुढे हेही म्हणाले की, गेल्या सात वर्षात २५ हजार ४६९ सायबर गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६ हजार ३०६ गुन्हे उघडकीस आले. यापैकी ३८३ प्रकरणे न्यायालयात निकाली निघाली असून त्यामध्ये ९९ आरोपींना शिक्षा झाली आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यांत यूपीचा पहिला तर त्यानंतर पश्चिम बंगाल आणि राज्यस्थान चा क्रमांक लागतो. या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. मात्र २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा ५ हजार १९० ने घटला आहे.