रेल्वेचा ‘स्टाफ’ बोलून २३ वर्ष विनातिकीट प्रवास

रेल्वे कंत्राटदारांचा रेल्वेलाच गंडा

रेल्वेचा ‘स्टाफ’ बोलून २३ वर्ष विनातिकीट प्रवास

रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. त्यात ही नाना प्रकारचे शक्कल लढवून लोक विनातिकीट प्रवास करत असतात. अशीच एक घटना चर्चगेट स्थानकात घडली आहे. तिकीट तपासणी करताना अनेकदा काही प्रवासी ‘स्टाफ’ असल्याचे सांगतात. त्यामुळे तिकीट तपासणीस कोणतीही खातरजमा करत नाहीत. ह्याच संधीचा फायदा घेत एका प्रवाशाने तब्बल २३ वर्ष विना तिकीट रेल्वेचा प्रवास केला आहे. संबंधित व्यक्ती रेल्वेचा कंत्राटदार असून त्यानेच गंडा घातल्याने स्पष्ट झाले आहे.

तिकीट तपासणीसाला संशय आल्याने त्याने ओळखपत्राची मागणी केली. पटेलने सन २००० मध्ये बनवलेले ओळखपत्र फाटलेले व खराब झालेल्या स्थितीत होते. त्यामुळे तिकीट तपासणीसची शंका अजून बळावली. त्यांनी ग्रेड पे ची विचारणा केली असता पटेल उत्तरे देण्यात विचलित झाल्याचे दिसले. भरारी पथकातील कुमार शर्मा, भावेश पटेल, अजय सारस्वत यांनी प्रश्नांचा भडिमार केला असता अमित पटेल रेल्वेचे कंत्राटदार असल्याचे कबूल केले.

विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष भरारी पथकाने तिकीट तपासणी मोहिम चालू केली होती. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीच्या विशेष पथकाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी करत असताना भरारी पथकातील तिकीट तपासणीस अब्दुल हजिज अब्दुल हमीद यांनी रेल्वे कंत्राटदार अमित कुमार पटेलकडे तिकीटांची मागणी केली असता ‘रेल्वे स्टाफ’ असल्याचे सांगितले.

 

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

पटेल यांच्या कडे असलेला पास हा गुजरात जिल्ह्यातील कलोल स्थानकातील कर्मचाऱ्यांचा आहे. या पासच्या आधारे बनावट रेल्वे पास तयार केला आहे. त्यावर शिक्का सुद्धा मारण्यात आला आहे. असे पोलिसानी सांगितले. पटेल यांनी या अगोदर बरेच वेळा लोकल, मेल-एक्सप्रेसच्या गाड्यातून विनातिकीट प्रवास केल्याचे कबूल केले. त्याअंतर्गत रेल्वे पोलिसानी पटेल च्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याचे सांगितले.

Exit mobile version