छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण २२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दुर्दैवाने कारवाई दरम्यान, छत्तीसगड जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चा एक जवान हुतात्मा झाला आहे.
पहिल्या आणि मोठ्या चकमकीत, गंगलूरमधील बिजापूर- दंतेवाडा सीमेवरील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले. याच कारवाईवेळी एक पोलिस जवानही हुतात्मा झाला. ही चकमक सकाळी ७ वाजता सुरू झाली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार अनेक तास सुरू होता. बिजापूर पोलिसांनी पुष्टी केली की आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून १८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा देखील जप्त करण्यात आला आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. यादरम्यान जंगलामध्ये शोधमोहीम राबवताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. शोध मोहीम अजूनही राबवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी ही मोहीम डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने राबवली.
22 Naxalites killed in two separate encounters in Chhattisgarh's Bijapur and Kanker districts https://t.co/znH8El6YFR
— ANI (@ANI) March 20, 2025
हे ही वाचा:
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
“दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केले”
कोस्टल रोड येथे ३० वर्षीय तरुणाची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या
तरुणीची गळा दाबून हत्या, मृतदेह दगडाला बांधून कालव्यात फेकला, आरोपी आसिफला अटक!
कांकेर जिल्ह्यात झालेल्या एका वेगळ्या कारवाईत, छोटेबेठिया येथील कोरोस्कोडो गावाजवळ झालेल्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दल कोम्बिंग ऑपरेशन करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “कांकेर जिल्ह्यातील कोरोस्कोडो गावाजवळ सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी कार्यकर्ते ठार झाले. ऑपरेशन आणि परिसराची तपासणी सुरूच आहे,” अशी पुष्टी अधिकाऱ्यांनी केली.