लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त  

लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त  

Drug syringe and cooked heroin on spoon

लक्षद्वीपजवळ समुद्रात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ड्रग्ज संदर्भात मोठी कारवाई केली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयच्या मदतीने ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाला गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार ‘खोजबीन मोहिम’ आखण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १ हजार ५२६ कोटी किंमतीचे २१९ किलो हेरॉईन जप्त केले आहे.

डीआरआयला ७ मे रोजी लक्षद्वीपजवळील समुद्रातून ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. गुप्त माहिती मिळताच अरबी समुद्रात पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती.

हे ही वाचा:

लालमहालातील लावणीने गदारोळ

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

दरम्यान, १८ मे रोजी ‘प्रिन्स’ आणि ‘लिटल-जिसस’ या दोन संशयास्पद बोटी भारताच्या किनाऱ्याकडे जाताना दिसल्या तेव्हा या दोन्ही बोटींचीही झडती घेण्यात आली होती. त्यानंतर या बोटींमध्ये एक किलो हेरॉईनची २१९ पाकिटे सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत १ हजार ५२६ कोटी इतकी आहे. समुद्रातचं हे ड्रग्ज सापडल्याचे या बोटीवरील लोकांनी सांगितले मात्र डीआरआय आणि तटरक्षक दलाने या बोटी कोचीला आणल्या आहेत. या प्रकरणाची पुढील चौकशी अजून सुरू आहे. त्यामुळे हे ड्रग्ज कुटून आणण्यात आले आणि कोणाला पुरवण्यात येणार होते याची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version