… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून मिळणाऱ्या ५० हजारांच्या मदतीचा फायदा उठविण्याच्या हेतूने चक्क जिवंत लोकांचीच नावे मृतांच्या यादीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधी अंबाजोगाई येथे घडला आहे. त्यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

कोरोना मृतांची नावे नोंदविलीच नसल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे पण आता जे जिवंत आहेत, त्यांचीच नावे मृतांच्या यादीत टाकण्यात आल्यामुळे आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर टीका होत आहे.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने ५० हजार रुपये देण्यात येतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव, पडताळणी ही कामे सुरू आहेत. त्याची माहितीही आरोग्य विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.

महसूल विभागाने जेव्हा याचा तपास केला तेव्हा अंबाजोगाई येथे कोरोना मृतांपेक्षा पोर्टलवर जास्त आकडा आढळला. अंबाजोगाई येथील तहसीलदाराकडे ५३२ मृतांच्या नावांची यादी होती. त्याविषयी तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन मृतांची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोरोना मृत व्यक्तींच्या यादीतील व्यक्ती जिवंत असल्याचे आढळले आणि धक्काच बसला.

हे ही वाचा:

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

शेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

 

अंबाजोगाई विभागाकडे ३१६ मृतांची नावे होती पण तहसिलदाराकडे ५३२ नावांची यादी होती. त्यामुळे २१६ नावे ही अधिक होती. ही नावे कुठून आली, असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला. अशा प्रकारे कोरोना मृतांत जिवंत व्यक्तींची नावे घुसडून त्यातून आर्थिक फायदा उठविणारी एखादी टोळी किंवा रॅकेट आहे का, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे.

Exit mobile version