पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!

पुण्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत तरुणीचे अपहरण केले गेले. त्यानंतर तिघांनी तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आपल्या मित्रांसह पुण्यातील कोंढवा येथील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेखां करीम पठाण आपल्या दोन मित्रांसह तेथे आला आणि मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत, याठिकाणी फिरणे हे बेकायदेशीर असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावत त्यांचे फोटो काढत तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि घाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या येवलेवाडीमध्ये नेण्यात आली. याठिकाणी तरुणीवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तरुणीला सोडून आरोपी पळून गेले.

हे ही वाचा : 

नसरल्लानंतर हिजबुल्लाचा संभाव्य नवा प्रमुख हाशिम सफिद्दीनला टिपले

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात

स्त्री शक्तीचा जागर: हिंदू मंदिरांच्या निर्मात्या, संरक्षक अहिल्याबाई होळकर

दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा

बचावलेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सुरुवातील पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र तरुणीसोबत असलेल्या मित्राने माहिती देताच पोलिसांकडून नव्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी कोंढवा येथील रहिवासी ३६ वर्षीय रहिवासी राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version