23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामादिल्लीत सापडली २ हजार जिवंत काडतुसे

दिल्लीत सापडली २ हजार जिवंत काडतुसे

सहा जणांचा केली अटक

Google News Follow

Related

सोमवारी, भारत आपल्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन अर्थात अमृतमहोत्सव साजरा करणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस विविध भागात हाय अलर्टवर आहेत. सुरक्षितेतच्या उपाययोजना करत असतानाच दिल्ली पोलिसांनी २ हजार जिवंत काडतुसांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शस्त्रास्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांमध्ये पुरवठा करणारे दोघे जण, डेहराडून येथील गन हाऊस मालक, रुरकी आणि डेहराडूनमधील प्रत्येकी एक आणि जमशेदपूरमधील एक अशा सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

अटक केलेल्या तस्करांची पोलीस चौकशी करत आहेत आणि स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय राजधानीत अशांतता निर्माण करण्याचा काही मोठा कट होता का याचा अधिक तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दारूगोळ्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आणि सहा तस्करांना अटक केली. सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी या तस्करांना आनंद विहार परिसरातून दोन बॅगांसह अटक केली.

अलिकडेच इसीस सदस्याला अटक

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानीत एका ‘सक्रिय इसीस सदस्याला अटक झाल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे. आरोपी हा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.

हे ही वाचा:

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या

लालकिल्ल्याभोवती कडक सुरक्षा

दरम्यान, ५,००० निमलष्करी आणि पोलीस अधिकार्‍यांसह ७० ते ७५ सैन्य, दिल्ली पोलिस सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त, स्वातंत्र्य दिनाच्या आधी उत्तर दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती तैनात आहेत. जानेवारीमध्ये लावण्यात आलेल्या ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्यतिरिक्त, पोलिसांनी आता आणखी ३१० कॅमेरे जोडले आहेत जे उच्च दर्जाचे आहेत, व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्स आहेत आणि कोणतीही संशयास्पद हालचाली आढळल्यास अलर्ट देऊ शकतात.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा