मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!

अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांची कारवाई

मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे बँकेच्या कॅश लोडिंग वाहनावर सशस्त्र दरोडा टाकून पळून गेलेल्या चौघांपैकी एकाला मुंबईतील अंधेरी पूर्व येथून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी एका दरोडेखोराला पकडून यूपी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिर्झापूर येथील रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या व्हॅन सप्टेंबर महिन्यात दरोडा टाकण्यात आला होता. २ मोटार सायकल वरून चौघांनी अंधाधुंद गोळीबार करून बँकेची रोकड लुटून पोबारा केला होता.या दरोड्याचा घटनेत सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते, याप्रकरणी कटरा पोलीस ठाण्यात, खून, खुनाचा प्रयत्न,दरोडा,शस्त्र प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.कटरा पोलीस ठाणे आणि यूपीएसटीएफ यांच्या कडून या दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत होता. या दरोड्यातील मिर्झापुर टोळीतील एक दरोडेखोर हा अंधेरी एमआयडीसी येथील सनसिटी हॉटेलच्या मागे असलेल्या झोपड पट्टी येथे लपून बसला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

हे ही वाचा:

‘आप’चे संजय सिंग यांच्यावर ईडीचे आरोपपत्र

तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली

आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वपोनि. सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर, तुकाराम (नाना )कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक यश पालवे आणि पथकाने शुक्रवारी रात्री उपाध्याय नगर झोपडपट्टी येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चंदन कमलेश पासवान याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या चौकशीत चंदन हा मिर्झापुर टोळीतील दरोडेखोर असल्याची माहिती समोर आली असून एमआयडीसी पोलिसानी त्याला ताब्यात घेवुन कटरा पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. कटरा पोलिसांनी चंदनला अटक करून ट्रान्झिस्ट रिमांडवर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन गेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.

Exit mobile version