अग्निवीरसाठी नौदलात प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मालाड मालवणी येथे घडली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महिला आयएनएस हमला येथे प्रशिक्षण घेत होती. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली असून पुढील कारवाई सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
अपर्णा नायर असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या रूमपार्टनरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती तिच्या खोलीत परतली आणि वारंवार दार ठोठावले तेव्हा नायरने प्रतिसाद दिला नाही. नंतर तिने इतर मुलींना आणि वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली, त्यांनी दरवाजा तोडला आणि तेथे नायरचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, त्यांनी मुलीची तपासणी करून तिला मृत घोषित केले.
हे ही वाचा:
ओलिस मुक्त होत नाहीत तोपर्यंत गळ्यात ‘डॉग टॅग’ घालणार!
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत फ्रेंच कंपनी थॉमसन भारतात लॅपटॉप बनवणार
केरळमधील अपहरण झालेल्या ६ वर्षीय मुलीची अखेर सुटका!
पप्पू अखेर २४व्या प्रयत्नांत पास!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णाचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यात दुरावा निर्माण झाल्यामुळे तिने बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तथापि, या प्रकरणाशी संबंधित तिच्या प्रियकराची चौकशी किंवा अटक झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
◆काय आहे अग्निवीर योजना ◆
अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांसाठी अग्निवीर हा शब्द वापरला जातो. ही योजना १४ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती.
अग्निपथ योजना ही लष्करात सेवा करण्याचा एकमेव मार्ग आहे. योजनेंतर्गत, सैनिक चार वर्षे सेवा देतात, ज्यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि ३.५वर्षे तैनाती समाविष्ट असते. निवृत्तीनंतर ते सशस्त्र दलात कार्यरत राहण्यासाठी अर्ज करू शकतात.