23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामहाराष्ट्रात एनआयएच्या छापेमारीत २० जणांना अटक

महाराष्ट्रात एनआयएच्या छापेमारीत २० जणांना अटक

महाराष्ट्र एटीएसचे छापे देखील आज संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी, मालेगाव, मुंबई आणि नवी मुंबईचा समावेश आहे.

Google News Follow

Related

टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने देशभरात छापेमारी केली आहे. देशासह महाराष्ट्र एटीएसने पीएफआयविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हेही दाखल केले आहेत. महाराष्ट्र एटीएसचे छापे देखील आज संपूर्ण राज्यात सुरू असून त्यात औरंगाबाद, बीड, परभणी, मालेगाव, मुंबई आणि नवी मुंबईचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून वीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मौलाना सैफुर रहमान याला मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफुर रहमान हे पीएफआयचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात एटीएसच्या विविध पथकांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, मालेगाव (नाशिक जिल्हा) आणि जळगाव येथे छापे टाकले आहेत.

एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एटीएसच्या पथकांनी राज्यातील विविध ठिकाणांहून किमान वीस जणांना अटक केली आहे. तसेच पथकाने महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे. एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांसंदर्भात एटीएस अधिकारी काही लोकांची चौकशीही करत आहेत.

हे ही वाचा:

शिवाजी पार्कवर कोणालाच परवानगी नाही, मुंबई महापालिकेचे पत्र

एनआयए आणि ईडीची दहा राज्यांमध्ये पीएफआयवर कारवाई, शंभरहून अधिक अटक

तीस्ताला नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती

तुम्हाला बापाचा पक्ष विकणारी टोळी म्हटले तर चालेल का?

एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत, प्रशिक्षण शिबिरांमध्ये गुंतलेल्यांच्या निवासस्थानांची आणि अधिकृत ठिकाणांची झडती घेतल्याचे माहिती आहे. महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत. पीएफआयचे मुख्य परवेज अहमदलाही अटक करण्यात आली आहे. अध्यक्ष परवेझ आणि त्याच्या भावाला येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीएफआयचे राष्ट्रीय सचिव व्हीपी नजरुद्दीन यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा