केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास

स्फोटाच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास

केरळच्या एर्नाकुलममधील बॉम्बस्फोटमालिकेचा तपास २० सदस्यांचे पथक करणार आहे. तसेच, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या स्फोटाच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या स्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या स्फोटाची जबाबदारी स्वीकारून डॉमिनिक मार्टिन ही व्यक्ती पोलिसांना शरण आली असली तरी पोलिसांनी या प्रकरणातील त्याच्या स्फोटातील सहभागाला दुजोरा दिलेला नाही. त्याची अजून चौकशी सुरू आहे. केरळचे पोलिस महासंचालक शेख दार्वेश साहेब यांनी कलामसेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमधील स्फोट आयईडीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. ही स्फोटके जेवणाच्या डब्यात ठेवण्यात आली होती. या स्फोटात तीन मृत्युमुखी पडले तर ५० जण जखमी झाले आहेत. त्यातील १२ जणांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यात एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. येथे एका ख्रिश्चन समूहातर्फे प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्फोटातील जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सुट्टीवर असणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याच्या सूचनाही आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

 

केरळमध्ये नुकतेच पॅलिस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी या बॉम्बस्फोटमालिकेचा संबंध या कार्यक्रमाशी जोडला आहे. ‘हमासच्या नेत्याला जिहादचा प्रसार करण्यासाठी व्यासपीठ दिल्यानंतर २४ तासांतच केरळ स्फोटांनी हादरले आहे. केरळमध्ये कट्टरवादाची बिजे रोवली जात आहेत. मी मल्याळी आहे आणि मल्याळी म्हणत आहेत, आता आम्ही हे सहन करू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे ही वाचा:

केरळमध्ये झालेल्या स्फोटाशी संबंधित ‘यहोवा विटनेसेस’ आहे तरी काय?

कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले देणार

आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!

टीएमसी मंत्र्याच्या मुलीने शिकवणीतून कमावले ३ कोटींची रक्कम

केरळमधील सर्व राज्यांच्या पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश सरकारतर्फ देण्यात आले आहेत. विशेषतः रेल्वे स्थानके आणि बस आगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या बॉम्बस्फोटांप्रकरणी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाही पोलिसांनी इशारा दिला आहे. सोशल मीडियावर अफवा तसेच द्वेषमूलक टिप्पणी करून जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा केरळ पोलिसांनी दिला आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) यांची पथके केरळमध्ये पाठवण्यात आली असून ती स्थानिक पोलिसांना या प्रकरणात मदत करतील. यात नॅशनल बॉम्ब डेटा सेंटरच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कर्नाटक आणि तमिळनाडूमधील केरळ सीमेनजीकच्या सुरक्षा चौक्यांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Exit mobile version