मुंबईतील सर्वात मोठी सोने बाजार पेठ म्हणून झवेरी बाजारपेठ ओळखली जाते. मात्र याच बाजार पेठेत काही ठगाणी नकली सोने विकून २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. झवेरी बाजारपेठेतील जाणकार आणि कसलेले सोने व्यापाराला काही ठगाणी हातोहात फसवल्याचे उघड झाले आहे. व्यापाऱ्यांनी सोने विकण्यासाठी आलेल्या या ठगांचे सोने तपासणीसाठी पाठवले असता, ते सोने नसून निव्वळ धातू आहे असल्याचे समोर आले आहेत.
झवेरी बाजारपेठ हे मुंबईती सोने खरेदीसाठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. याच बाजार पेठेत ‘जय ज्वेलर्स’ नावाचे दिलेश पारेख यांचे सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. मात्र २६ ऑक्टोबर रोजी राजेश प्रजापती असे नाव सांगणारा एक तरुण मित्र व महिलेसह दुकानात आला. त्यावेळी घरातले जुने दागिने विकायचे आहेत. असे कारण सांगितले. त्यानुसार सोबत आणलेल्या दगिन्यांपैकी काही सोन्याच्या माळा दाखविल्या. पारेख यांनी सोन्याचे काही तुकडे काढून घेतले. व ते तपसणीसाठी ‘महावीर टच’ यांच्याकडे पाठवले. मात्र या तपासणी अहवालात सोन्याचे दागिने २२ व २३ कॅरेट असल्याचे नमूद करण्यात आले. यानुसार प्रति तोळा ४० हजार रुपये देण्याची बोली ठरली. या नुसार ५१० ग्रॅम वजनांचे दागिने विकण्यासाठी आणले होते. या ५१० ग्रॅम वजनांचे ४० हजार रुपये तोळा या प्रमाणे एकूण किंमत २० लाख ४० हजार रुपये होत असून, २० लाख रुपये देण्याची पारेख यांनी तयारी दर्शवली. राजेश यांनी त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांनी थोडा वेळ विचार करून, वीस लाख रुपये घेण्याची तयारी दर्शवली.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी
फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मात्र ठगांनी यावेळी, वेगळी चाल खेळून एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्यास भीती वाटत असल्याचे कारण पुढे देत, राजेश यांनी दुकांनाच्या बाहेर येऊन पैसे देण्यास सांगितले. पारेख यांनी त्यांच्या नोकराला पैसे दुकानाच्या बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. दुकानाचा काही अंतरावर जावून राजेश यांच्या कडे २० लाख रुपये सोपवण्यात आले. त्यानंतर लगेच या तिघांनी पैसे घेऊन पसार झाले. पारेख यांनी सोने पुन्हा तपासणीसाठी पाठवले असता, सोने तपासणी अहवाल पाहून पारेख यांना धक्काच बसला कारण, हे सोने नसून केवळ पिवळा धातू आहे. असे नमूद करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येता पारेख यांनी लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.