घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात हस्तिदंत विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली असून या दोघाजवळून दोन हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या हस्तिदंताची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे वपोनि. जितेंद्र आगरकर यांनी दिली.
दिपककुमार प्रभुदयाल वैष्णव (२४) आणि मोहम्मद फिरोज हाफीक शेख (३०) असे अटक करण्यात आलेल्या दोघाची नावे आहेत. मूळचे राजस्थान येथे राहणारे हे दोघे घाटकोपर परिसरात हस्तिदंताची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वनरक्षाच्या मदतीने या दोघांना गुरुवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. या दोघाजवळून नक्षीकाम केलेले दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी पुन्हा मंदिर उध्वस्त केले
जप्त करण्यात आलेले हस्तिदंताची बाजारात २०लाख रुपये किंमत असल्याची माहिती आगरकर यांनी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वन्यप्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे