अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

गुजरात मधील घटना

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

पीटीआयच्या बातमीनुसार,गुजरात राज्यात अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे.स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) नुसार, गुजरातमधील विविध जिल्ह्यांत पावसामुळे एकूण २० मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. रविवारी राज्यात पडलेल्या तीव्र अवकाळी पावसाच्या दरम्यान विजेच्या धक्क्याने हे मृत्यू झाले आहेत.

देशभरातील अनेक राज्यात अवकाळी पावसाच्या घटना घडल्या.मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत होता.अचानक दोन दिवसांपासून देशातील विविध राज्यात अवकाळी पाऊस पडला.मात्र, या अवकाळी पावसामुळे गुजरात राज्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज कोसळून २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विजेच्या धक्याने मृत पावलेल्यांची जिल्हानिहाय माहिती स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाहोदमध्ये चार,भरूचमध्ये तीन, तापीमध्ये दोन, आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर,देवभूमी द्वारका येथील प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे,अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा:

लग्न परदेशात कशाला, इथेच करा आत्मनिर्भर भारतासाठी!

एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’

पाकिस्तान झाला बेहाल; नागरिकांना अन्न मिळणंही झालंय कठीण!

पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप

या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,”असे शहा यांनी ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर माहितीनुसार, गुजरातच्या सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये १६ तासांत ५०-११७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारपासून पावसाच्या हालचालींमध्ये हळूहळू घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Exit mobile version