फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू!

थायलंडच्या सुफान बुरी प्रांतातील घटना

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू!

थायलंडमध्ये बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सुमारे १५ लोक ठार झाले आहेत.तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.मृतांच्या संखेत वाढ होण्याची शक्यता आहे.मिडिया रिपोर्टनुसार, या दुर्घटनेत किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य थायलंडमधील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला.स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. समरकुन सुफन बुरी रेस्क्यू फाऊंडेशनच्या सदस्य कृत्सदा माने-इन यांनी सांगितले की, आम्ही मृतांच्या संख्येची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत.या अपघातात १५ ते १७ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजाराच्या निर्देशांकात लक्षणीय घट

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक

या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.बचाव कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून मृतांच्या संख्येची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत.फोटोमध्ये आग विझवल्यानंतर, काळ्या धुराचे प्रचंड लोट हवेत उठताना दिसत होते.

दरम्यान, गेल्या वर्षी जुलैमहिन्यात दक्षिण थायलंडमधील फटाक्यांच्या गोदामात स्फोट झाला होता.या दुर्घटनेत किमान १० लोक ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते.या आगीत १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले होते.

Exit mobile version